डेहराडून(उत्तराखंड):- दारु दुकानदाराकडून सातत्याने फसवणूक आणि गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. शेवटी जिल्हधिकाऱ्यांनीच याची खातरजमा करण्याचं ठरवलं. स्वतः कलेक्टर दारु घेण्यासाठी गेल्यानंतर त्यांच्या सोबतही तसाच प्रकर घडला.डेहराडून शहरामध्ये ही घटना घडली आहे.जास्तीच्या दराने दारुविक्री करणाऱ्या दुकानदाराचा भांडाफोड जिल्हाधिकाऱ्यांनी केला. जिल्हाधिकारी सविन बन्सल हे स्वतः सोबत स्टाफ न घेता दुकानात गेले होते. त्याचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलेलं आहे.
जिल्हाधिकारी बन्सल हे एका सामान्य ग्राहक प्रमाणे रांगेत उभे राहिले आणि दारुची बाटली खरेदी केली. त्यांनी McDowell’s ची बाटली घेतली. त्या बाटचीली किंमत ६६० रुपये होती. परंतु त्यांच्याकडून ६८० रुपये उकळण्यात आले.ही घटना जिल्हा प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर शहरातल्या दारु विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार तातडीने कारवाईची पावलं उचलण्यात आली. जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर छापेमारी करण्यात आली.उपजिल्हाधिकारी हरी गिरी यांनी चुना भट्टा या ठिकाणी असेलल्या दारु दुकानावर छापा मारला. येथे जास्तीच्या दराने दारु विक्री आणि इतर अनियमितता आढळून आल्या. एका ग्राहकाला २०० रुपयांची बिअरची बाटली २१० रुपयांना विक्री केल्याचं निदर्शनास आलं.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, दुकानातल्या मॅनेजरने लिखित स्वरुपात चूक झाल्याची कबुली दिली असून यापुढे असे प्रकार होणार नाही, असं म्हटलंय. दुकानामध्ये रेट बोर्ड योग्य ठिकाणी लावलेले नव्हतं, हेही तपासणीमध्ये लक्षात आलं.जिल्हा प्रशासनाने केलेल्या कारवाईत ओल्ड मसुरी रोडवरील दुकानाला ५० हजार रुपये दंड ठोठावण्यात आला, चुना भट्टा येथील दुकानावर ७५ हजार रुपयांचा दंड, सर्वे चौक ७५ हजार आणि जाखन येथील ठेक्याला ५० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.