जयाताई लाभसेटवार
उप संपादिका
इंद्रावती विदर्भ टाइम्स.
दारव्हा (यवतमाळ):- महाराष्ट्राच्या कृषीप्रधान संस्कृतीचं स्मरण आणि जगांचा पोशिंदा शेतकऱ्यांचे खरे मित्र बैल यांचे आभार मानण्याचा दिवस म्हणून पोळा सण संपूर्ण महाराष्ट्रभर उत्साहात साजरा केला जातो. दुसऱ्या दिवशी बाळ गोपाळांचा लाकडी, मातीचे नंदीबैल सजवून पारंपरिक वेशभूषा मध्ये तान्हा पोळा साजरा केला जातो. याचाच एक भाग म्हणून जिल्हा परिषद शाळा ईरथळ येथे तान्हा पोळा चे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने वर्ग पाहिली ते सातवी चे सर्व विद्यार्थी आपापले लाकडी, मातीचे नंदीबैल घेऊन पारंपारिक वेशभूषे मध्ये उपस्थित झाले होते. सर्व विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. शाळेच्या पटांगणामध्ये पोळ्याचे तोरण बांधण्यात आले. या तोरणाला रंगीबेरंगी पाने, फुले व फुग्यांनी सजवण्यात आले. पोळ्याची खासियत म्हणून महादेवाची गाणी व झडत्या म्हणण्यात आल्या. यानंतर सर्व नंदीबैलांवर गुढी फिरवून पोळा फुटला असे जाहीर करण्यात आले. सर्व मुलांना खाऊ , पेन, बक्षीस वाटप करण्यात आला.श्याम राठोड, गजानन केंबल ,पुनम जाधव यांनी नंदीबैलांचे परीक्षण केले व त्यातून प्रत्येक वर्गातील एकाला प्रथम क्रमांक देण्यात आले. तसेच शालेय उपक्रमाचा एक भाग व कार्यानुभव या विषयातील एक घटक म्हणून विद्यार्थ्यांना मातीचे बैल बनवून आणण्यात सांगण्यात आले. विद्यार्थ्यांनी सुद्धा अतिशय सुबक देखण्या अशा मातीच्या बैलांच्या मुर्त्या तयार करून आणल्या. त्यांचे सुद्धा परीक्षण एस टी इंगळे (मुख्याध्यापक) पी आर दुधे (शिक्षक) भगत मॅडम (शिक्षिका) चिंचोले मॅडम (शिक्षिका) अमित राठोड (अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती) सोमेश्वर दरेकर, मनोज राठोड, बाबुराव गावंडे यांनी केले. तर श्याम राठोड यांनी ६५ विद्यार्थ्यांना प्रोत्साहन बक्षीस दिले, या तान्या पोळ्यात अंगणवाडीचे विद्यार्थी यांनी सुद्धा मातीचे बैल आणले अशा पद्धतीने विद्यार्थ्यांच्या पारंपारिक वेशभूषेमध्ये तान्ह्या पोळ्याच्या निमित्ताने सर्व शाळेत आनंदाचे वातावरण होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील नागरिकांनी मित्र मंडळांनी सहकार्य लाभले.