
अहेरी:- दक्षिण गडचिरोलीतील चाणक्य अकॅडमीने अत्युत्तम कामगिरी करत ३० विद्यार्थ्यांना महाराष्ट्र पोलीस दलामध्ये स्थान मिळवून दिले आहे. हा अपार यश चाणक्य अकॅडमीच्या विद्यार्थी आणि शिक्षकांच्या कठोर परिश्रमांचे फळ आहे.
अहेरीत चाणक्य अकॅडमी स्थापना २०१७ मध्ये कऱण्यात आली.तर आलापल्लीत चाणक्य अकॅडमी तथा अभ्यासिकाची स्थापना २०२१ ला करण्यात आले.यापूर्वी विविध क्षेत्रात ४५ विद्यार्थी तर आता पोलीस खात्यात ३० विद्यार्थी एकूण ७५ विद्यार्थ्यांनी कामगिरी दाखवली आहे. चाणक्य अकॅडमी चे संस्थापक/मार्गदर्शक जुगल बोम्मनवार,संचालक/मार्गदर्शक अभिषेक बोम्मनवार,कोच प्रकाश पेंदाम,मार्गदर्शक पंकज पोटे यांच्या अथक परिश्रमाने चाणक्य अकॅडमीतील विद्यार्थ्यांनी उत्तुंग भरारी घेतली आहे.
अकॅडमीचे मार्गदर्शक जुगल बोम्मनवार यांच्या नेतृत्वाखाली, या विद्यार्थ्यांनी अभ्यासात उत्कृष्ट कामगिरी केली असून, स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी आवश्यक ती शिस्त आणि निर्धार दाखविला आहे. हे यश दक्षिण गडचिरोलीसाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे, जो या क्षेत्रातील युवकांना सक्षम बनविण्याच्या दिशेने चाणक्य अकॅडमीच्या योगदानाचे प्रतीक आहे.
सर्व निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे आणि चाणक्य अकॅडमीच्या टीमचे हार्दिक अभिनंदन. तुमचे कष्ट आणि समर्पण खरोखरच प्रशंसनीय आहेत आणि भविष्यातही असेच यश संपादन करण्यासाठी प्रेरणा देणारे ठरतील. असे मत साई तुलसी गिरी यांनी व्यक्त केले आहे.