याबरोबरच जिल्ह्यातील १२ प्राथमिक आणि एका माध्यमिक शिक्षकास जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.
गडचिरोली :- शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने गडचिरोली जिल्ह्यातील ४ शिक्षकांची राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड केली आहे. याबरोबरच जिल्ह्यातील १२ प्राथमिक आणि एका माध्यमिक शिक्षकास जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. गुरुवारी (दि.५) राज्यस्तरीय आदर्श शिक्षकांना मुंबईत तर जिल्हास्तरीय आदर्श शिक्षकांना गडचिरोली येथे सन्मानित करण्यात येणार आहे.
राष्ट्रपतींच्या हस्ते होणार सन्मान
राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांमध्ये चामोर्शी तालुक्यातील नवेगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील शिक्षक आशिष येल्लेवार, गडचिरोली येथील राणी दुर्गावती कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षिका संध्या शेषराव येलेकर, एटापल्ली तालुक्यातील वाळवी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक श्रीकांत काटेलवार आणि कारवाफा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक जितेंद्र रायपुरे यांचा समावेश आहे.
या बरोबरच जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांमध्ये जिल्हा परिषद शाळांतील शिक्षक घनश्याम हटेवार (खुर्सा,ता.गडचिरोली), थलाश धाकडे (शेगाव, आरमोरी), साधना भुरसे(डोंगरगाव, हलबी,ता.देसाईगंज), गुरुदेव मेश्राम (हु-यालदंड,ता.कुरखेडा), गौरव कावळे (टाहकाटोला, ता.कोरची), जितेंद्र रायपुरे (कारवाफा, ता.धानोरा), आशिष येल्लेवार (नवेगाव रै,ता.चामोर्शी), दीपक मंडल (उदयनगर, ता.मुलचेरा), वाल्मिकी वन्नेवार (कसूरवाही,ता.एटापल्ली), जगन्नाथ बडगे (कुमरगुडा, ता.भामरागड), रवींद्र येमसलवार (शिवणीपाठ ता.अहेरी), श्रीनिवास रंगू (असरअली, ता.सिरोंचा), तर माध्यमिक विभागात सिरोंचा येथील जिल्हा परिषद हायस्कूलचे शिक्षक एन.आर.मरसकोल्हे यांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी आयुषी सिंह यांनी सर्व पुरस्कारप्राप्त शिक्षकांचे अभिनंदन केले आहे